Search This Blog

Tuesday, July 19, 2011

कट्टा !!!

कट्टा कट्टा ..मन्हाल की समोर येतो पोरांचा अड्डा !
पोरांच्या गप्पा ,आणि त्यांचा राडा ..


पण खरच ..आहे का रे तो फक्त टपोरयांचा कट्टा ??
टवाळक्या सोडून ..तिथे होते फक्त थट्टा आणि थट्टा ..!


तिथे करतो आम्ही कोणाची तरी टिंगल तर कधी मस्करी !(तेही तोंडावर हा ! मागे नाही ) ,
म्हणून काय म्हणायची त्याला टपोरीगिरी !


कधी रंगतो राजकारणाचा विषय ,तर कधी खेळाच्या गोष्टी !
अन सुरु होतात भांडण ! अन पुन्हा त्याच गप्पा गोष्टी !


शाळेच्या आठवणीनाही कधी कधी येतो उधान ..
मग कधी तरी शिव्या देवून ..मिळते काहीना समाधान !!


खर तर कट्टा आहे मैत्रीचा मजबूत खांभ !
तेव्हा कोणी काहीही म्हटले ,तरी मित्रा नको जावू लांब !


--तुमचा लाडका अनिल नारनवर.